#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

अविस्मरणीय क्षण

अविस्मरणीय क्षण

ब्लॉग उद्घाटन
     
 दिनांक 28/10/2016



    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती गंगाधरी तालुका नांदगाव या शाळेच्या "ज्ञानामृत" या ब्लॉगचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी श्री.चव्हाण साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. शैक्षणिक वर्ष 2016-17 च्या पोखरी केंद्राच्या पहिल्या शिक्षण परिषदचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगाधरी मोठी व खैरनारवस्ती यांच्या संयोजनाने पार पडले.
       याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी मा. श्री.चव्हाण साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती ठोके मॅडम, केंद्र प्रमुख व्ही.व्ही.टिळेकर सर , सरपंच सौ. केदाताई इघे व ग्राम पंचायत सदस्य दिगंबर भागवत  आदी उपस्थित होते. नांदगाव तालुक्यातील प्रथम ब्लॉग बनविणाऱ्या शिक्षिका श्रीमती आशा चिनेयांच्या  विविध ब्लॉगचे उदघाटन यावेळी करण्यात आले. 
          ब्लॉग तयार करणार्‍या त्या तालुक्यातील पहिल्या  शिक्षिका आहेत. यावेळी तळेवस्ती शाळेच्या विविध उपक्रमांची ppt व व्हिडिओ दाखविण्यात आला. विविध शैक्षणिक माहितीचे संकलन  या ब्लॉग्जमध्ये करण्यात आले आहे. जसे शाळेचे विविध उपक्रम, डिजिटल स्कुल, इ- लर्निंग, ज्ञानरचनावाद, संगीतमय परिपाठ,ब्लॉग्जचे app, ऑडिओ, व्हिडिओ, ऑनलाइन टेस्ट ,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शासन परिपत्रके, अभ्यासविषयक व शिक्षकोपयोगी माहिती यात आहे.ब्लॉगला भेट देण्यासाठीhttps://talevasti.blogspot.in , https://ashachine.blogspot.in, http://talevasti.wordpress.com , http://talevastig.wordpress.com  हे वेब अड्रेस वापरा.  यावेळी मान्यवरांनी तळेवस्ती शाळेचे दोन्ही उपक्रमशील शिक्षक श्रीमती आशा ज्ञानदेव चिने व श्री गोरखनाथ जाधव सरांचे विविध उपक्रम आयोजना संदर्भात कौतुक केले. या शिक्षकांनी विविध अडचणीतही विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले आहेत. व एक महिला शिक्षिका  ब्लॉगनिर्मिती करते अशा प्रकारचे कौतुकास्पद  गौरवोद्गार  काढले. 
       याप्रसंगी पोखरी केंद्राचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. व्य.स.अध्यक्ष शिवाजी खैरनार, सुनिल शिंदे, रामहरी इघे, संजय पवार सर, निवृत्ती बागुल सर, कन्नोर सर , विनायक बोरसे सर, मोगलसर, चंद्रकांत शिंदेसर, नामदेव पवारसर , संजय कोकणीसर ,  विनोद मेश्राम, श्रीमती गायत्री पाटील मॅडम,  श्रीमती ज्योती पाटील मॅडम आदीसह नागरिक व शिक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापु आहिरेसर, श्रीमती हर्षा बिसंदरे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन राजेंद्र कदमसर यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश आहिरेसर यांनी केले...




तसेच

 महिला प्रशिक्षण नाशिक
दिनांक ३ व ४ ऑक्टोबर २०१६
🙏 *नमस्कार*🙏 

*नाशिक जिल्हा महिला तंत्रस्नेही प्रशिक्षण - टप्पा १ला*

_*शिक्षणाधिकारी (नाशिक) व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक (डाएट)*_ 

यांच्या संयुक्त विद्यमाने,
*नवरात्री* च्या खास निमित्ताने जिल्ह्यातील महिलांना तंत्रज्ञान वापरात अधिक सशक्त बनविण्यासाठी तसेच *"प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र"* कार्यक्रमान्तर्गत तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करून मूल शिकण्यात सहाय्य करण्यासाठी *नाशिक जिल्ह्यातील 365* महिलांचे तंत्रस्नेही प्रशिक्षण आयोजित केले आहे. प्रशिक्षण एकूण *चार* टप्प्यात आयोजित केले असून त्यातील पाहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.



*महिला तंत्रस्नेही प्रशिक्षण - टप्पा १ ला*

*दि. ३ व ४ ऑक्टोबर, २०१६*

♦ *विशेष आभार -*
*श्री प्रविण अहिरे साहेब (शिक्षणाधिकारी-नाशिक)*
*श्री सूर्यवंशी साहेब (प्राचार्य, डाएट-नाशिक)*

🔷 *प्रशिक्षण समन्वयक -*
*श्री ख़ारके साहेब (ज्येष्ठ अधिव्याखाते, डाएट-नाशिक)*

🔶 *प्रशिक्षण सुलभक -*
*गौरी पाटील - (उपशिक्षिका- निफाड)*
*अर्चना घाड़गे - (उपशिक्षिका- त्र्यम्बकेश्वर)*

नाशिक महिला तंत्रस्नेही प्रशिक्षण टप्पा पहिला यांत सर्वात आनंददायी बाब अशी की, 

🔵 *आदरणीय नंदकुमार साहेब (प्रधान शिक्षण सचिव), यांनी कार्यशाळेतील महिलांशी फोनद्वारे साधलेला संवाद...* 🔵

                   तसेच

           🔴 *प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व तंत्रस्नेही महिलांना जिल्हास्तर प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र*🔴

☯_*तंत्रस्नेही प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढे काय?*_

यासाठी, 
*श्री अहिरे साहेब (शिक्षणाधिकारी-नाशिक)* यांनी सुचविले की, प्रत्येक महिलेने यापुढे *५ महिलांना* प्रशिक्षित करावे... व सर्व महिलांना तंत्रस्नेही प्रवाहात पुढे आणावे.
*श्री सूर्यवंशी साहेब (डाएट-प्राचार्य, नाशिक)* यांनी सांगितले की विविध स्पर्धाद्वारे स्वनिर्मित इ -साहित्य तयार करण्यावर भर देणे तसेच यासंदर्भातील जिल्हास्तर उपक्रमांचे संपादन करणे.


☣ *प्रशिक्षणातील महिलांनी प्रात्यक्षिकाद्वारे संपादित केलेले तंत्रज्ञानातील घटक -*
1) gmail - id तयार करणे.
2) पीपीटी तयार करणे.
3) पीपीटी चा वीडियो बनविणे.
4) गूगल app चा प्रभावी वापर करणे.
5) youtube वर स्वतःचे channel तयार करणे.
6) youtube वर वीडियो अपलोड करणे व डौन्लोड करणे.
7) QR कोड तयार करणे व त्याचा अध्यापनातील वापर करणे.
8) गूगल फॉर्म तयार करणे.
9) संगणक व लैपटॉप यातील सॉफ्टवेयर व हार्डवेयर ची माहिती.
10) मोबाइल app तयार करणे.
11) एंड्राइड app चा प्रभावी वापर करणे - ब्लेंड कोलाज, विवा वीडियो, कार्ड मेकर, नोटबुक, neo-reader, mirror-op, बारकोड generated, WPS, PDF फ़ाइल मेकर.
12) ऑनलाइन टेस्ट तयार करणे.
13) डेटा शेयरिंग करणे.
14) मुलांना आवडणारे कार्टून्स चित्रे व त्याचा आवाज वापरून उत्कृष्ठ असे वीडियो बनविणे.
15) डिजिटल शाळा व इ-लर्निंग या संदर्भातील माहिती.
16) विविध शैक्षणिक वेबसाइट व ब्लॉग यांचा अध्यापनासाठी वापर.
दि.४/१०/२०१६  

माझे स्वागत व अभिनंदन करताना
श्री सूर्यवंशी साहेब (प्राचार्य, डाएट-नाशिक)
सोबत
प्रशिक्षण समन्वयक 
*श्री ख़ारके साहेब (ज्येष्ठ अधिव्याखाते, डाएट-नाशिक)






No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect