#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

A Garden of words

इंग्रजी शब्द पाठांतर करणे   

मी हा  उपक्रम इंग्रजी शब्द पाठांतर करण्यासाठी घेतला.

वर्ग-४ थी

गरज- १)PSM मुळे इंग्रजी कडे होणारे दुर्लक्ष 
२)इंग्रजी हा कठीण  वाटणारा विषय 
३)कमी वेळात जास्तीत जास्त व परिणामकारक अध्यापन करणे.

कार्यवाही -
१)प्रथम खेळाचे काही नियम बनविण्यात आले.
२) मुले विरुध्द मुली असे दोन गट करण्यात आले.
३)खेळाचे काही नियम ठरविण्यात आले. 
४)खेळाची वेळ ठरविण्यात आली.
५)खेळासाठी अगोदरच दोन अक्षरी व तीन अक्षरी  जास्तीत जास्त शब्द शोहून लिहिण्यास सांगितले.
६)मूल्यमापन मी स्वतःच केले व हरल्यामुळे नैराश्य येणार नाही, याउलट तोही गट किती सरस आहे हे पटवून दिले.
(येथे शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मनाला जपावे. व पुढच्या खेळासाठी प्रेरित करावे.)
७)जिंकणाऱ्या गटाचे अभिनंदन केले.

नियम-
१)दोन व तीन अक्षरी शब्द विद्यार्थ्यांनी आधीच लिहून ठेवावे.
२)१०मि.वेळ द्यावी..
३) शब्दांची क्रमवारी महत्वाची .दोन्ही गटात एकही सारखा शब्द नसावा.
४)प्रथम शब्द लिहिणाऱ्यास प्राधान्य. 
५) वजा गुण नियम.
६)फळ्यावर एकच विद्यार्थी शब्द लिहील, इतरांनी खाली बसून व  लिहिणाऱ्याच्या कानात शब्द सांगावा, म्हणजे  दुसरा शब्द  ऐकणार नाही.
७)जास्तीत जास्त शब्द लिहिण्याचा प्रयत्न करावा.

यशस्वीता-

१) मनोरंजनातून शिक्षण - हसत -खेळत  शिक्षण
२)शोधक वृत्तीचा विकास 
३)निरीक्षण क्षमता विकसित होते .
४)तुलना व  अध्ययन गतीत वाढ  होते.
५)स्पर्धेमुळे चुरस वाढते.
६)नियमांमुळे चुकीचा शब्द , पुन्हा - पुन्हा शब्द लिहिणे  यांसारख्या चुका कमी होतात .
७)घोकंपट्टीची सुट्टी.
८) हसत-खेळत शब्द पाठांतर .
९) कृतियुक्त अध्ययन होते.
१०)यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचनात व लिखाणात सुधारणा झाली.










यानुसार वयोगट व काठीण्यपातळीनुसार उपक्रमात लवचिकता ठेवावी.
मी हा उपक्रम भाषा व इतर विषयांसाठीही राबविला.

उपक्रम कसा वाटला ... नक्की प्रतिक्रिया दया.
धन्यवाद!!!
श्रीमती आशा चिने , नांदगाव 

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect