#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

लक्षात ठेवा व लिहा

लक्षात ठेवा व लिहा 

वर्ग-४ थी


कार्यवाही -
  • १)विद्यार्थ्यांना प्रथम काही कार्ड वाटप करण्यात आले .
  • २) मुले विरुध्द मुली असे दोन गट करण्यात आले.
  • ३)खेळाचे काही नियम ठरविण्यात आले. 
  • ४)खेळाची वेळ ठरविण्यात आली.
  • ५) कार्ड दूरच ठेवण्यास सांगितले.
  • ६)विद्यार्थ्यांनी कार्ड वाचायचे , लक्षात ठेवायचे व न बघता फळ्यावर लिहायचे .
  • ७)दिलेले कार्ड लिहून झाल्यावर कार्ड आणून आपण लिहिलेले शब्द स्वतःच तपासायचे.
  • ८)किती शब्द बरोबर लिहिले याचा ताळा स्वतःच करायचा .
  • ९)जिंकणाऱ्या गटाचे अभिनंदन केले.





  • हरल्यामुळे नैराश्य येणार नाही, याउलट तोही गट किती सरस आहे हे पटवून दिले.

    • (येथे शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मनाला जपावे. व पुढच्या खेळासाठी प्रेरित करावे.)

    नियम-
    • १) विद्यार्थ्यांनी शब्द आधीच वाचून ठेवावे.
    • २)१०मि.वेळ द्यावी..
    • ३)  पुन्हा पुन्हा शब्द नसावा.
    • ४)प्रथम शब्द लिहिणाऱ्यास प्राधान्य. 
    • ५) वजा गुण नियम.
    • ६)फळ्यावर सर्व विद्यार्थी शब्द लिहीतील.
    • ७) सर्व शब्द लिहिण्याचा प्रयत्न करावा.
    • ८)अक्षर महत्वाचे नसून फक्त लेखनात चुका नसाव्यात .


    यशस्वीता-

    • १) मनोरंजनातून शिक्षण - हसत -खेळत  शिक्षण
    • २)शोधक वृत्तीचा विकास 
    • ३)निरीक्षण क्षमता विकसित होते .
    • ४)तुलना व  अध्ययन गतीत वाढ  होते.
    • ५)स्पर्धेमुळे चुरस वाढते.
    • ६)नियमांमुळे चुकीचा शब्द , पुन्हा - पुन्हा शब्द लिहिणे  यांसारख्या चुका कमी होतात .
    • ७)घोकंपट्टीची सुट्टी.
    • ८) हसत-खेळत शब्द पाठांतर .
    • ९) कृतियुक्त अध्ययन होते.
    • १०)यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचनात व लिखाणात सुधारणा झाली.













    यानुसार वयोगट व काठीण्यपातळीनुसार उपक्रमात लवचिकता ठेवावी.
    मी हा उपक्रम इंग्रजी  व इतर विषयांसाठीही राबविला.

    उपक्रम कसा वाटला ... नक्की प्रतिक्रिया दया.
    धन्यवाद!!!
    श्रीमती आशा चिने , नांदगाव 


    5 comments:

    1. अप्रतिम कार्य , आपल्या कार्यास शुभेच्छया

      ReplyDelete

    ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

    Follow me to get updates.

    Recent Posts Widget
    snow effect